नाशिक जिल्ह्यातील ३१ पोलिसांना पदके जाहीर

8

नाशिक, दि.१ मे २०२० : पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाची पोलिस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ३१ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मनमाडचे उपअधिक्षक समीर साळवे व नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांचा समावेश आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाची पोलिस महासंचालक पदके जाहीर केली आहेत. यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १६, नाशिक ग्रामीण पोलिस दलातील ९, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह महाराष्ट्र पोलिस अकादमीतील ३, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील १, दहशतवाद विरोधी पथकातील ३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नाशिक ग्रामीण मनमानडचे उपअधिक्षक समीर साळवे यांना नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी तर, नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना गुन्ह्यांची उत्कृष्टपणे उकल केल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस सेवा काळात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.

पदक जाहीर झालेले अधिकारी, कर्मचारी: उपअधिक्षक समीर साळवे (नक्षलविरोधी कारवाईत उल्लेखनीय कामगिरी), उपअधिक्षक दिनकर पिंगळे (लाचलुचपत प्रतिबंधक) पोलिस निरीक्षक आनंदा वाघ (गुन्हे शाखा, नाशिक), पोलिस निरीक्षक प्रभाकर घाडगे (उत्तम सेवा), उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक नितीन चंद्रात्रे, अनिल भालेराव, भागीरथ हांडोरे, हवालदार विनोद पाटील, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, पोलिस नाईक मनिष धनवटे (डीटीएस नाशिक), शेख अलिम शेख सलीम, पोलिस नाईक देवराम सुरंगे, साधना खैरनार (नागरी हक्‍क संरक्षण, नाशिक), भारत पाटील. उपअधिक्षक समीरसिंग द्वारकोजीराव साळवे (नक्षलविरोधी कारवाई), सहाय्यक उपनिरीक्षक सुनील आहिरे (उत्तम सेवा), जावेद इब्राहिम देशमुख, भाऊसाहेब ठाकरे, हवालदार दिलीप देशमुख, शांताराम नाठे, अण्णासाहेब रेवगडे, पोलिस नाईक तुषार पाटील, भारत कांदळकर. राजेंद्र ठाकरे, हवालदार दिनेश सूर्यवंशी, सचिन अहिरराव. (महाराष्ट्र पोलीस अकादमी), महादेव वाघमोडे , हवालदार रफिक पठाण, पोलिस नाईक अनिल घुले. (दहशतवाद विरोधी-पथक).

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा