मुंबई, दि. २६ एप्रिल २०२० : कोरोना किही घातक आहे हे आपण जाणून आहोत. तरी सुद्धा काही महाभाग कसलीही फिकीर न करता घराबाहेर पडत आहेत. आणि अशा महाभागांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना उन्हातान्हात ड्यूटी बजावावी लागत आहे. आपली एक चूक प्रशासनाच्या आत्तापर्यंतच्या प्रयत्नांना सुरुंग लावू शकते हे अशा मंडळींच्या लक्षातच येत नाही. त्यातून एखादा आजारी पडला तर वैद्यकीय उपचारांकरता धावाधाव करावी लागते.
पण ही झाली सामान्य नागरिकांची गोष्ट. मात्र अत्यावश्यक सेवा बजावणार्या पोलिसांना देखील अशी आरोग्य सेवा मिळवताना काय त्रास सहन करावा लागतो तो या व्हिडिओ मधून दिसत आहे.
आपल्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर गस्त घालणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. लोकांच्या सेवेत स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा वेळ आलीच तर पोलिसांना सामान्य नागरिकाप्रमाणेच वैद्यकीय सेवा दिल्या जातं आहेत. त्यांना कोणतीही वेगळी सेवा दिली जात नाही हे या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.