मेडिटेशन- प्राणायाम गरजेचे…

पुणे, १९ जुलै २०२२: सध्याच्या धक्काधकीच्या जीवनात आयुष्याची गाडी ही नेहमीचा ट्रॅक सोडून पळत आहे. त्यामुळे आत्महत्या, मर्डर आणि नैराश्याने सगळ्यांना ग्रासले आहे. यासाठी आता जीवनाला शिस्त लावण्याची गरज आहे. यात सगळ्यात महत्त्वाची ठरणारी प्रणाली म्हणजे मेडिटेशन… ध्यान-धारणा
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सध्याच्या काळात मैडिटेशनची गरज आहे. यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करा.

१. रोज सकाळी नाष्ट्याच्या आधी मेडिटेशन करावे. यासाठी ओमकारचा उच्चार करत रहावा. साधारण एक मिनिटापासून ते पाच मिनिटापर्यंत असा ओमकार वाढवत न्यावा. याने आत्मशुद्धी होते.

२. जर नवीन मेडिटेशन शिकत असाल म्युझिक थेरपीचा वापर करावा. आजकाल अनेक प्रकारचे संगीत बाजारात मेडिटेशनसाठी उपलब्ध आहे.

३. मेडिटेशनसाठी त्राटक नावाची प्रणाली उपलब्ध आहे. ज्यात तुम्ही मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहून तुम्ही मेडीटेशन करु शकता. त्राटकातले अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

४. हास्य क्लब किंवा मेडिटेशेन क्लब जॉईंन करुन तुम्ही मेडिटेशन करु शकता.

५. हिरवळीवर चालणे, किंवा व्यायाम करणे हे देखील एक प्रकारचे मेडिटेशन होय. मात्र त्यात सातत्य हवे.

६. प्राणायाम हे देखील ध्यानधारणेबरोबर तेवढेच महत्त्वाचे आहे. प्राणायामाने हृदयाच्या झडपेची उघडझाप व्यवस्थित होते. जेणेकरुन हार्टअटॅक टाळू शकतो.

७. कपालभाती हा एक उत्तम व्यायाम आहे, जेणेकरुन पोटावरची चरबी कमी होते.

८. अनुलोम-विलोमने श्वासाची प्रक्रिया उत्तम रित्या सुरु होऊन फुप्पुसे व्यवस्थित कार्यरत रहातात.

मेडिटेशन- प्राणायमाचे फायदे

१. मनाचा आणि शरीराचा थकवा घालवणे, हा मेडिटेशनचा मुख्य उपयोग होय.

२. मानसिक शांती मिळणे आणि नैराश्य घालवण्यासाठी मेडिटशन उपयुक्त ठरते.

३. हृदयाचे विकार हे टाळण्यासाठी मेडिटेशन आणि प्राणायाम अतिशय आवश्यक आहेत.

४. मेडिटेशनने मन शांत रहाते आणि मनाची एकाग्रता वाढते.

एकविसावे शतक हे खळबळजनक शतक म्हणून नावाजले जात आहे. कोरोनासारख्या भयंकर आजाराशी लढताना आपल्याला मानसिक शक्ती कणखर असणे, यासाठी मेडिटेशन आणि प्राणायाम हे श्वास घेण्याइतकेच महत्त्वाचे झाले आहे, हेच सत्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा