एलएसीवर चीनच्या कृतीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयात बैठक

नवी दिल्ली, दि. २६ मे २०२०: भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैन्य गेल्या काही दिवसांपासून एकमेकांसमोर आले आहेत. सीमा वादावरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव वाढत चालला आहे. दोन्ही सैन्य आपल्या मोर्चावर ठाम आहेत. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालयांमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राजनाथ सिंग सह तिन्ही सैन्यांचे प्रमुख उपस्थित आहेत. चीन आणि भारत सीमेवरील प्रत्यक्ष सीमा संरक्षण (एलएसी) वर काय परिस्थिती आहे याबाबत आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.

लडाख प्रदेशात चीनच्या बाजूने सातत्याने वाढणार्‍या सैनिकांची संख्या पाहता आता भारतदेखील तैनाती वाढवणार आहे. पूर्वी लडाखमध्ये जे घडले त्यापासून भारताने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली नजर तीक्ष्ण केली आहे आणि प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्व लडाख आणि सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. केवळ लडाखच नाही तर गेल्या एका महिन्यात चीन आणि भारत यांच्यात तीन भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे.

पश्चिम विभागात लडाख, पूर्व क्षेत्रातील उत्तर सिक्कीम आणि उत्तराखंड या तिन्ही भागात भारताचे सैन्य आणि चिनी सैन्य समोरा समोर आले आहेत. ५,००० हून अधिक चिनी सैनिक अलीकडेच वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) दाखल झाले आहेत. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा सामना ५-६ मेच्या सुमारास सुरू झाला आणि ही परिस्थिती सिक्कीम पर्यंत होती.

दुसरीकडे, लष्कराच्या कमांडर्सची द्वैवार्षिक परिषद २७ ते २९ मे दरम्यान दिल्लीत होणार आहे. चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लडाख येथे होणाऱ्या या परिषदेत लष्कराचे उच्च अधिकारी सहभागी होतील. बैठकीची दुसरी फेरी जूनच्या अखेरीस होईल. यापूर्वी ही परिषद एप्रिलमध्ये होणार होती, परंतू कोविड-१९ लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनी सांगितले की, चीनबरोबर वास्तविक नियंत्रण रेषेत आणि पाकिस्तानबरोबर नियंत्रण रेषेत (एलओसी) कामकाजाच्या मुद्दांवर या परिषदेत विचार होण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा