नवी दिल्ली,२० ऑगस्ट,२०२० : दिल्लीत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची बैठक संपन्न झाली आहे. तसेच कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी , सरचिटणीस चंपत राय आणि अन्य सदस्य नृपेंद्र मिश्रा, सुरेश भैयाजी जोशी आणि विश्व हिंद परिषदेतील काही सदस्य या सभेचा भाग होते. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे बांधकाम सुरू झाले आहे. आणि अभियंता आता त्या जागेवर मातीची चाचणी घेत आहे. असे ट्रस्टने आज ट्विट करून सांगितले.
तसेच या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंदिर निर्माण करत असताना लागणाऱ्या दगडांना जोडण्यासाठी तांब्याचा वापर केला जाईल. तसेच निर्माण करण्यासाठी १८ इंच लांब ,३ मिमी खोल तसेच ३० मिमी रूंद अशा १०,००० पत्त्यांची आवश्यकता भासणार आहे.
तसेच ते म्हणाले की तीर्थ श्री राम भक्तांना आव्हान करते की तांब्याचे पत्ते दान करावे.या तांब्याच्या पत्त्यावर दान करते आपल्या परिवाराचे किंवा स्वतःचे नाव गोंदवू शकतात. असे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या प्राचीन आणि पारंपरिक बांधकाम तंत्राचे पालन करून हे मंदिर बांधले जाईल. तसेच हे वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती टिकवण्यासाठी देखील बांधले जाईल .
न्यूज अनकट प्रतिनिधी :