महाराष्ट्रात होणाऱ्या बैठका आत्ता दिल्ली गुजरातमध्ये होतात संजय राऊतांची राज्य सरकार वर टीका

मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज ते पश्चिमी क्षेत्रीय परिषद बैठक घेणार आहेत. या बैठकीत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एकेकाळी महाराष्ट्रात बैठका होत होत्या, आज दिल्ली किंवा गुजरातमध्ये बैठका होत आहेत.

गुजरात हे गृहमंत्र्यांचं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे ते पॉलिटिकल बॉस आहेत. एक काळ असा होता की महाराष्ट्रात सर्व ठरवलं जायचं. महाराष्ट्रच हायकमांड होतं. महाराष्ट्र देशाला दिशा देत असे. आता नव्या सिस्टिमनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गुजरातला जावं लागत आहे, आता महाराष्ट्रात काही राहिलं नाही. सर्व बाहेर जात आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही निर्णय घ्यायला गुजरात किंवा दिल्लीला जावं लागत असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

नीरव मोदी, मेहूल चोक्सीप्रमाणे राज्याच्या तिरोजीचीही लूट सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. निधीच्या माध्यमातून राज्यात हजारो कोटी रुपयांची लूट सुरू असल्याचे सांगत, निधी वाटपावरुन खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निधी वाटपाची चौकशी करण्याची मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी केली.

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. हा लोगो देशातील युवा, बेरोजगारांसह सर्वांनाच प्रेरणादाई आहे, हा भारत देश आहे आणि या देशात आमच्यावर घाव करणे किंवा हल्ला करणे महागात पडेल, अशी प्रेरणा देणारा हा लोगो असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया जितेगा याचाही त्यांनी पुर्नउच्चार केला. या लोगोचे अनावर ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता होणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा