पुणे, १६ सप्टेंबर २०२० : येत्या ऑक्टोबरमध्ये फ्लिपकार्ट सुमारे ७०,००० लोकांना नोकरी देणार आहे.
कंपनीने याबाबत सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार असून याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील.
सध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी ते क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्यांना प्रशिक्षण देत आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे.
तसेच हँड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल.
अॅमेझॉनने देखील सांगितले की, त्यांच्या ऑनलाइन ऑर्डर वाढत असल्याने आणखी 1 लाख लोकांना कामावर घेणार आहेत. अॅमेझॉनने सांगितले की नवीन कर्मचाऱ्यांना पार्ट टाईम आणि फुल टाईम कामाचे पर्याय असणार आहेत. यामध्ये पॅकिंग, शिपिंग आणि ऑर्डरची क्रमवारी लावण्यात मदत करायचे काम असेल.
न्यूज अनकट