कोलंबो, १७ सप्टेंबर २०२३ : आशिया चषकाची फायनल भारत आणि श्रीलंका (भारत विरुद्ध श्रीलंका) यांच्यात आज होणार आहे. ही हाय व्होल्टेज स्पर्धा कोलंबोमध्ये होत आहे. एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील उभय संघांची ही ८वी लढत आहे. याआधीच्या ७ सामन्यांमध्ये भारताने ४ तर श्रीलंकेने ३ जिंकले आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १६६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यातील भारताने ९७ सामने जिंकले असून श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. यासोबतच ११ सामन्यांचा निकाल लागला नाही तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
सूत्रांकडून कळते की, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम फेरीसाठी कोलंबोला बोलावण्यात आले आहे. मात्र, बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.
आशिया कप २०२३ मध्ये सलामीवीर शुभमन गिल भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला आहे. तर, कुलदीप यादव सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. सदिरा समरविक्रमाने आशिया कप २०२३ मध्ये श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर मथिश पाथिरानाने श्रीलंकेसाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्यातच श्रीलंकेचा फिरकीपटू महिष तेक्षाना दुखापतीमुळे अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समराविक्रामा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, दुनिय वेलालागे, मथिश पाथिराना आणि प्रमोद मदुशन.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड