हैदराबाद, १९ सप्टेंबर २०२२: मेगास्टार चिरंजीवी हा, त्याच्या ४० वर्षांच्या शानदार कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटासाठी वितरक शोधत आहे. त्याचा ‘गॉडफादर’ चित्रपट कोणताही वितरक प्रदर्शित करण्यास तयार नाही. याचे कारण म्हणजे चिरंजीवीचा मागील चित्रपट ‘आचार्य’ हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.
‘आचार्य’ हा चित्रपट १४० कोटी रुपयांच्या मोठया बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, पण या चित्रपटाने केवळ ७४ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. फ्लॉप झाल्याने या चित्रपटाचे निर्माते आणि वितरक दोघांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. निर्मात्यांना तोट्यापासून वाचवण्यासाठी चिरंजीवींनी त्यांची अर्धी फीही परत केली होती.
चिरंजीवीचा गॉडफादर हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता, हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे ३ आठवडे उरले असून, चित्रपटाला अद्याप वितरक मिळालेले नाहीत. सध्याची परिस्थिती पाहता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाईल असे दिसते.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे