गोल पोस्ट महाराष्ट्र मैंदा गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मैंदा गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीड: बीड तालुक्यातील पिपंळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मैंदा गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी एका संशयीत आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेतील मुलगी ही अल्‍पवयीन आहे. आई- वडील ऊसतोड मजूर आहेत. ते गेल्या महिनाभरापासून ऊसतोडणीसाठी बाहेर गेले होते. त्‍यामुळे पीडित मुलगी आपल्‍या लहान भाऊ व बहीन यांना सांभाळ करत आजी आजोबांच्या सोबत राहात होती. गावात आसलेल्या ज्ञानेश्वर संपत मोमीन (वय १८) या तरुणाने रस्त्यावर एकटी जात आसताना पीडित मुलीला बोलावून घरामध्ये बळजबरीने ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर पीडित मुलीला वडवणी येथील खाजगी रुग्णालयाचे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी पीडितेला दाखल करून न घेतल्‍याने बीड येथे त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पीडित मुलीचे आई – वडील कारखान्याहून पुन्हा गावी परतल्यानंतर पीडित मुलीला घेऊन आई वडिलांनी पिपंळनेर पोलिस ठाणे गाठले. यावेळी आरोपी ज्ञानेश्वर संपत मोमीन या संशयीत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध सपोनि शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिपंळनेर पोलिस करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version