नवी दिल्ली, ५ सप्टेंबर २०२०: केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या कविता आणि वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. नुकताच त्यांनी स्वताच्या पक्षाबद्दल विधन करत “आता रिब्लिकन पक्षात ऐकी राहिली नसून, पक्ष हा गटबाजीने विभागला गेलाय. या सर्वांना एकत्र आणायचे असेल तर मग फक्त डाॅं प्रकाश आबेंडकरच आणू शकतात आणि पक्षातील या गटबाजीमुळे कुठल्याही मोठ्या पक्षाबरोबर युती करणेच योग्य” असे म्हटले होते. या विधानाला अजून आठवडा उलटला नाही तोपर्यंत त्यांनी आता अजून एक विधान हे काँग्रेस पक्षावर केले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या वादावरुन केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी तोडगा सुचवला आहे. “काँग्रेसचे अध्यक्षपद सध्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी स्विकारायला तयार नाहीत. माझी काँग्रेसला सुचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि शरद पवार यांना अध्यक्ष करावा. “या बाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेसनेच करवा असे आठवले यांनी म्हटले.
त्यांच्या या विधानामुळे ते ट्रोल होत असून अजूनपर्यंत काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही प्रतिक्रीया आली नाही. तर रामदास आठवलेंच्या या सल्ल्यावर हे पक्ष कशा पद्धतीने व्यक्त होतात हे पाहणं रंजक ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी