बारामती उपप्रादेशिक कार्यालयाचा गोंधळलेला कारभार

बारामती, ६ ऑक्टोंबर २०२०: बारामती उपप्रादेशिक कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा संशयास्पद असल्याचा दिसून येत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तीन तालुक्यातून दुचाकी, चारचाकी वाहनांचे कच्चा वाहन परवानासाठी येणाऱ्या नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.

बारामती शहरातील उपप्रादेशिक कार्यालयाच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानं वाहनधारक परवाना मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून त्यांना वेळ दिल्यावर नियमानुसार अर्ज करून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हजार राहतात. मात्र, कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी आर्थिक देवाणघेवाण करून येणाऱ्या लोकांना दुजाभावपणाची वागणूक देत असल्याची चर्चा आहे.

बारामतीसह इंदापुर व दौंड तालुक्यातील नागरिकांना सोयीसुविधा व जलद गतीनं कामाचा उरक व्हावा या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील उपप्रादेशिक कार्यालयाच्या धरतीवर बारामतीमध्ये भव्यदिव्य कार्यालयाची निर्मिती केली. तीन तालुक्यामधील नागरिकांना दुचाकी-चारचाकी वाहन परवाना, पक्का वाहन परवाना तत्काळ व्हावीत या उद्देशानं या कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. परंतु शिकाऊ अनुज्ञाप्ति, वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना, महिलांना नियमानुसार सर्व बाबींची पूर्तता करूनही अडवणूकीला सामोरे जावे लागत असल्याचं येथे आलेल्या नागरिकांनी सांगितलं.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा