पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: सोशल मिडीया म्हणजे सगळ्याचे लाडके फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे यंदाचे वर्ष नुकसानीतच गेले असे म्हणावे लागेल. कारण मागच्या १३ महिन्यात झुकरबर्ग मेटा कंपनीच्या मालकीच्या फेसबुकच्या अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे. फक्त फेसबुक युजर्सचेच नाही तर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या फॉलोअरमध्ये देखील घट झाली आहे. ११ कोटी नऊ लाख फॉलोअर्स असलेल्या झुकरबर्गचे आता केवळ ९ हजार ९९४४ इतकेच फॉलोअर्स उरले आहेत. परंतु, यातील काही युजर्सचे फॉलोअर्स रिकव्हर झाले आहेत. फॉलोअर्स कमी झाल्यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वास्तविक मेटा प्लॅटफॉर्मला दुसऱ्या तिमाहीत खास कमाई करता आलेली नाही. यामुळे झुकरबर्गच्या संपत्तीत ११ अब्ज डॉलरची घट झाली आहे. मागील १३ महिन्यांत झुकरबर्गच्या एकूण संपत्तीचे १०० अब्ज डॉलर पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, झुकरबर्गची संपत्ती आता ३८.१ अब्ज डॉलर्स आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसल्याचं दिसत आहे. यामुळे झुकरबर्गला संपत्तीत मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे. जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. या यादीत मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्गचं नाव आघाडीवर आहे.
सलग दुसऱ्या वर्षी तीन महिन्यांच्या कालावधीत मेटा कंपनीचा महसूल घसरला आहे. मेटा कंपनीचा वार्षिक महसूल गेल्या वर्षाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी घसरला आहे. मेटाच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये मेटाचे शेअर्स २५ टक्क्यांनी खाली घसरले होते. त्यामुळे फेसबुक आता नक्की फोलोअर्स वाढवण्यासाठी काय रणनीती आखणार आणि झुकरबर्ग काय निर्णय घेणार, हे पहाणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस