गोल पोस्ट गुन्हा मेथीची भाजी समजून खाल्ली गांजाच्या पानांची भाजी

मेथीची भाजी समजून खाल्ली गांजाच्या पानांची भाजी

कनूज, २ जुलै २०२० : कनूज येथील मियागानी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. येथील एका भाजी विक्रेत्याने मेथीच्या नावाखाली या कुटुंबातील निलेश नावाच्या व्यक्तीला चक्क गांजा वनस्पतीची जुडी विकली. निलेशलाही याची काही कल्पना नसल्याने त्याने त्याच्या वहिनीला ही भाजी दिली. तिने भाजी शिजवून कुटुंबातील सहा जणांनी भाजी खायला दिल्याने त्यांना त्रास जाणवू लागला.

या घटने नंतर सर्वांची तब्येत बिघडू लागली तेव्हा त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्ध पडले हा विचित्र प्रकार बघून शेजारच्यांनी थेट पोलिसांना फोन केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच सर्वांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत स्वयंपाकघरात कढईमध्ये शिजवलेली गांजांची तसेच उरलेली गांजाची पानही ताब्यात घेतली. या प्रकरणात पोलिसांनी भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. भाजी विक्रेत्याने गमंत म्हणून निलेशला मेथीऐवजी गांजाची पानं दिल्याचे सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version