गोल पोस्ट राजकारण मी निवृत्त व्हावे असा विचार दिसतोय : शरद पवार

मी निवृत्त व्हावे असा विचार दिसतोय : शरद पवार

बारामती: बारामती तालुक्यातील शारदा नगर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक शेती विज्ञान प्रदर्षणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा सत्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

या सत्कारावर माझ्या हातात पुष्पगुछ देऊन मला निवृत्त करण्याचा यांचा विचार दिसतो. असे अनेकांना वाटले होते मी निवृत्त होईल. मात्र महाराष्ट्रातील जनतेने तसे घडू दिले नाही. अशा शब्दात उध्दव ठाकरे व अजित पवार यांच्यावर पवारांनी मिश्किल पणे म्हणाले.

‘कृषिक २०२०’ या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीत झाले. यावेळी शरद पवार बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसवर्धनमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अभिनेता आमिर खान, आमदार रोहित पवार, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने शेती क्षेत्र अतिशय महत्वाचे क्षेत्र आहे. प्रत्येक वर्षी शेती क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. या क्षेत्रात काम करणारा सर्व सेवक वर्ग आणि त्यांना साथ देणारे सरकार चांगले काम करत आहे. जगात शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक बदल घडत आहे. दिवसेदिवस लोकसंख्या वाढ आहे. लोकांच्या दैनदिन गरजा पूर्ण करण्याचे काम शेतीमुळे शक्य होत आहे. आणि त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. शेतीत घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांच्या दारात संशोधन गेले पाहिजे. मात्र सर्वाच्च न्यायालयाने मर्यादा घातल्यानं शेती संशोधनावर मर्यादा आल्या आहेत. खरेतर जे उपयोगी, फायदेशीर आहे, त्याला विरोध होणे अपेक्षित नाही. न्यायालयाच्या या निर्णयावर मी काहीच भाष्य करणार नाही. मात्र जे सर्वांसाठी हानिकारक आहे त्याला विरोध करा त्यास माझी मान्यता आहे असे पवारांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!
Exit mobile version