वडोदरा, गुजरात १९ फेब्रुवारी २०२५ : वॉमेन्स प्रीमियर लीग सध्या सुरू असून मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर ५ विकेट्सनी विजय मिळवत या हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे. हा सामना वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सला १२० धावांचे लक्ष दिले होते. गुजरात संघाकडून हरलीने सर्वाधिक धावा करून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. तिने ३१ चेंडूत ३२ धावा केल्या ज्यामध्ये ४ चौकरांचा समावेश होता. १२० धावांचे लक्ष मुंबई इंडियन्सने अवघ्या १६.१ षटकांत पूर्ण केले. मुंबई इंडियन्सकडून नॅट सिव्हर ब्रंटने शानदार अर्धशतकाची खेळी केली ज्याच्या जोरावर मुंबई इंडियन्सने १२२ धावा करत विजयावर आपला शिक्कामोर्तब केला.
मुंबई इंडियन्सने या हंगामात विजय मिळवत पॉइंट टेबल मध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोच घेतली आहे. सध्या पॉइंट टेबलमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अव्वल स्थानावर आहे, काल झालेल्या पराभवानंतर गुजरात संघ पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला असून त्यांचा रनरेट -0.५२५ इतका झाला आहे.
मुंबई इंडियन्सने मिळवला पहिला विजय –
वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला असून हेली मॅथ्यूजने या हंगामात पहिल्यांदाच पर्पल कॅपवर दावा केला आहे. या हंगामाच्या दिल्ली कपिटल्सविरुद्धच्या पहिल्या समन्यात तिने २ विकेट्स घेतल्या होत्या.काल झालेल्या गुजरात जायंट्सच्या सामन्यात तिने ३विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपला दावा केला आहे. मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटलच्या पहिल्या सामन्यात २ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या या हंगामात दिल्ली कॅपिटल आपला पहिला विजय शोधत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर