मायक्रोसॉफ्ट कंपनीही करणार नोकर कपात; जगभरातून पाचे टक्के कर्मचारी कपातीचा निर्णय

नवी दिल्ली, १९ जानेवारी २०२३ : जगप्रसिद्ध ‘ट्विटर’, ‘मेटा’, ‘फेसबुक’, ‘अ‍ॅमॅझॉन’, आणि ‘शेअच चॅट’नंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही नोकरकपातीचा निर्णय घेतल्याने आयटी क्षेत्रात चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’ने पाच टक्के कर्मचारी कपात करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुख्यत्वे मनुष्यबळ आणि इंजिनिअरिंग विभागांत ही नोकर कपात केली जाण्याची शक्यता आहे. या कंपनीत जगभरात ३ लाख २१ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. त्यापैकी एकट्या अमेरिकेत कंपनीचे १ लाख २२ हजार कर्मचारी सेवेत आहेत. तर ९९ हजार कर्मचारी हे जगभरात विस्तारलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्सनल कॉम्प्युटर विक्री क्षेत्रात मंदी आहे. त्याचा फटका ‘मायक्रोसॉफ्ट’ला बसला आहे. याच कारणामुळे ‘मायक्रोसॉफ्ट:कडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येच जवळजवळ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यामुळे आयटी क्षेत्रात चिंतेचे वातावण पसरले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा