साताऱ्याच्या कोयना भागात भूकंपाचे सौम्य धक्के, तीव्रता ३.३ रिश्टर स्केल

सातारा, १७ ऑक्टोंबर २०२३ : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली. कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा सौम्य भूकंप झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास कोयना धरण परिसर सौम्य भूकंपाने हादरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही.

मात्र, अचानक आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या भूकंपामुळे मध्यरात्रीच्या सुमारास अनेक लोक घराबाहेर पडले. भीतीमुळे काही लोक रात्रभर जागे राहिले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. गेल्या तीन महिन्यांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.आता भूकंपामुळे अनेक भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली.

ऑगस्ट महिन्यातही साताऱ्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हा भूकंप १६ ऑगस्टला झाला होता. जिल्ह्यातील काही गावांमध्ये मोठा आवाज झाला आणि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सातारा जिल्ह्यात आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहेत. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा