क्रिकेटपटू मिलिंद रेगे कालवश!

27
Milind Rege Milind Rege Death मिलिंद रेगे
क्रिकेटपटू मिलिंद रेगे कालवश!

क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांनी वयाच्या ७६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीनं क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसलाय.

मिलिंद रेगे यांची कारकीर्द
मिलिंद रेगे एक अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकटचे आधारस्तंभ म्हण़ून त्यांना ओळखलं जातं. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधार म्हणून त्यांनी संघाचं नेतृत्व केलं. मुंबई संघासाठी त्यांनी एकूण ५२ प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांमध्ये १२६ बळी घेतले, तसेच २३.५६ च्या सरासरीनं १,५३२ धावादेखील पटकावल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्य, निवड समिती प्रमुख अशा विविध पदांचा कार्यभारदेखील त्यांनी सांभाळला.

सचिनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिली होती संधी
रेगे सरांच्या निधनाची बातमी समजताच सचिन तेंडुलकरनं दु:ख व्यक्त केलंय. सचिन तेंडुलकरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी संधी दिली होती. सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियाद्वारे मिलिंद रेगे सरांना श्रद्धांजली वाहिलीये. “मुंबई क्रिकेटमध्ये रेगे सरांचं अमूल्य असं योगदान आहे. त्यांच्या निधनानं एक कधीही भरुन न निघणारी मोठी पोकळी तयार झाली आहे”, असं सचिननं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. रेगे सरांनीच आपल्याला ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’साठी (सीसीआय) खेळायला सांगितलं असल्याचं सचिननं सांगितलंय.

सुनिल गावस्कर यांचे जवळचे मित्र
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर आणि मिलिंद रेगे हे अगदी बालपणीपासूनचे मित्र होते. त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सोबतच झाले. दादर युनियन स्पोर्टिंग क्लबमध्ये ते एकत्र खेळले होते.

विश्वजीत राळे, न्यूज अनकट प्रतिनिधी

Read more: क्रिकेटपटू मिलिंद रेगे कालवश!

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा