गोल पोस्ट शैक्षणीक पहिली पासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, दादा भुसे यांची घोषणा…

पहिली पासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, दादा भुसे यांची घोषणा…

Maharashtra students to get army training
पहिली पासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण, दादा भुसे यांची घोषणा…

Dada Bhuse announces military education: राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी पहिली पासूनच राज्यातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी;नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version