माढा तालुक्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुध आंदोलन .

7

माढा, १ ऑगस्ट २०२० : माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने विविध गावांमध्ये दुध बंद आंदोलन करण्यात आले. ऊजनी (टें) येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने मारूतीला दुग्धाभिषेक करून महाआघाडी सरकारला सुबुद्धी येवू दे असे साकडे घालण्यात आल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.

यावेळी दुध ऊत्पादक शेतकरी परशुराम नवले,बाबासाहेब पानबुडे,माजी ऊपसरपंच समाधान गवळी,मच्छिंद्र घाडगे,बापू कवडे,विश्वजीत पाटील आदीजण उपस्थित होते. सरकारने गाईच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान दिले पाहीजे. तसेच दूध भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान दिले पाहिजे.

कोरोनामुळे शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या नुकसानीस महाआघाडीचे सरकारच जबाबदार आहे. सध्याचे सरकार दूध उत्पादकांना पेक्षा व्यापाऱ्यांना सांभाळत आहे. तरी या सरकारच्या विरोधात संपूर्ण माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटना आक्रमकपणे दुध आंदोलन करून करत आहे .असे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.

माढा तालुक्यामध्ये शेवरे येथे रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दुध वाहतुक बंद करत आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी जगदीश मस्के,गणेश साळुंके,गोविंद पाटील,बापु कांबळे,राजू पाटील,लखन सुरवसे, गुरू कांबळे,पप्पु सुरवसे,संकेत मस्के,गणेश काळे आदी दुध ऊत्पादक शेतकरी ऊपस्थित होते.

माढा तालुक्यातील रिधोरे येथे रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड,जिल्हासंघटक बळीराम गायकवाड यांनी दुध बंद आदोलन करीत गावातील दुध संस्था बंद केल्या.यावेळी दत्तात्रय गायकवाड,बळीराम गायकवाड,प्रशांत करळे,राजकुमार गायकवाड,संदिप गायकवाड,गजेंद्र शिंदे,दिंगंबर शिंदे,नितीन गायकवाड,अभिजीत ढोरे आदी दुध ऊत्पादक शेतकरी सहभागी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा