गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई एसटीच्या लाखो प्रवाशांना मिळणार स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी

एसटीच्या लाखो प्रवाशांना मिळणार स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं ‘नाथजल’ या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण परिवहन मंत्री आणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते काल करण्यात आलं.

सर्व बस स्थानकावर ६५० मिलीलिटर आणि १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे १० रुपये आणि १५ रुपये असणार आहे, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.

टप्याटप्यानं राज्यातील सर्व बसस्थानकावर ‘नाथजल’ हे एसटी महामंडळाचं अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बसस्थानकावर कोणत्याही इतर कंपन्यांचं पेयजल विकण्यास बंदी असेल असं परब यांनी यावेळी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version