सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि.२५ मे २०२० : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रविवारी( दि.२४) रोजी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईतील त्यांच्या कार्यालयाने त्याला दुजोरा दिला. चव्हाण हे गेल्या आठवड्यातच मुंबईहून नांदेडला गेले होते. तेथे त्यांची चाचणी करण्यात आली असता अहवालात संसर्ग झाल्याचे निषन्न झाले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात आता आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री नुकतेच कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याआधी राज्यात महत्त्वाच्या पदावर काम केलेले आणि मंत्रिमंडळात सध्या एक महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

अशोक चव्हाण यांना उपचारासाठी नांदेडहून मुंबईत आणण्याची शक्यता आहे. अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा