रायगड, २४ जुलै २०२३ : मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारांवर होणारा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी, मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण ११ लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख आणि लोकसहभागातून दहा लाख रुपयांची मदत दिली. त्यात अनुक्रमे संवेदना सोशल फाउंडेशन कोल्हापूर, पुणे, युवा स्वराज्य, आई प्रतिष्ठान आणि चैतन्य प्रतिष्ठान या सर्वांनी मिळून १० लाखांची मदत केलीय, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर