‘मंत्री दादा भुसेंनी पोलिसांसमोर युवकाला फटकावलं’, जितेंद्र आव्हाडांनी केला व्हिडिओ ट्विट

मुंबई, २७ डिसेंबर २०२२मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ, एका हिरकणी कक्षांमधील असल्याचे दिसते आहे. या व्हिडीओत मंत्री दादा भुसे दोन तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

जितेंद्र आव्हाड पोस्टमध्ये काय म्हणाले?

ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करताना, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात, मुख्यमंत्री साहेब… कुठला गुन्हा पोलिस घेणार… पोलिसांसमोर मारले.. माझा नग्न फोटो फेसबुकवर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत. सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौज उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक झाली… आता बोला’, असा सवालही आव्हाड यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, व्हिडीओत मंत्री दादा भुसे या तरुणांना शिवीगाळ करत मारहाण करताना दिसून येत आहे. या तरुणांची नेमकी चूक काय होती? कोणत्या कारणासाठी दादा भुसे तरुणांना मारहाण करत आहेत? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर देण्यात येते ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा