जळगाव, १५ ऑगस्ट २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. याबाबत काँग्रेस नेते बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असून ते राजीनामा देतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल असे म्हणताना दिसत आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजारपणाचे कारण समोर करून त्यांचा राजीनामा घेतला जाईल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते.
आता त्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत, मी आजच त्याबाबत माहिती घेतली आहे. मात्र त्यांच्या आजारपणाचे कारण काढणे चुकीचे आहे. यामध्ये कुठलेही तथ्य नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
तसेच मुख्यमंत्र्यांबाबत मी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोनवरून माहिती घेतली. आजारपणामुळे ते खरोखर येथे येऊ शकले नाहीत. मात्र त्यांच्या आजाराचे कारण काढणे ही दुर्दैवी बाब आहे. वडेट्टीवार यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर