गोल पोस्ट महाराष्ट्र पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक

पालघर, १८ डिसेंबर २०२२ : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघर तालुक्यातील माहीम येथील एका निर्जन ठिकाणी १५ वर्षीय एका तरुणीवर आठ नराधामांनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी सातपाटी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे.
माहीम येथे वास्तव्य करणारी एक तरुणी आपल्या मित्रासह किनाऱ्या लगतच्या टेंभी परिसरात गेली असता निर्जन ठिकाणी असणाऱ्या बंगल्यांमध्ये आठ तरुणांनी आलटून पालटून रात्रभर बलात्कार केला. त्यानंतर शनिवारी सकाळी या मुलीला भीती दाखवून पालघर जवळील माहीम हरणवाडी परिसरात सोडून देण्यात आले.आरोपी तरुणापैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईल संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी काल दुपारी फिर्याद दाखल केली. मुलीचे वय व प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलीचे मोबाईल लोकेशन द्वारे सातपाटी पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले व मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रसंग सांगतिला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या काळात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

दरम्यान,पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version