मिरजगाव येथे शेतकऱ्यांचे उपोषण

कर्जत.८.जुलै.२०२० : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे शासन मान्य कृषी सेवा केंद्र आहे. या खरेदी केंद्रामध्ये शेतक-यांकडून हमाली मापाडीच्या नावाखाली प्रति किलो एक रुपया, या प्रमाणे ज्यादा पैसे घेतले जातात.

या विषयसंदर्भात कसून चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी दिनांक ७ जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात महेंद्र धांडे, ऋषिकेश धांडे , अतुल धांडे, सागर देमुडे , रावसाहेब धांडे यांचा सहभाग आहे.

या आंदोलनासाठी प्रहार संघटनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा विमलताई आनारसे यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा