गोल पोस्ट महाराष्ट्र मिस इंडियाला कोरोनाची लागण……

मिस इंडियाला कोरोनाची लागण……

मुंबई , १० ऑगस्ट २०२० : कोरोना आता सर्वत्र पसरला असून त्याचा विळखा आता कोणालाही सोडताना दिसत नाही. अनेक राजकिय नेते आणि कलाकारांना या कोरोनाची लागण होत असल्याचे वृत्त काही नवीन नाही. त्यात अनेक जणांनी यावर मात करुन घरी देखील परतले आहेत. तर माजी मिस इंडियाला आता या विषाणुची लागण झाली आहे.

माजी मिस इंडिया अभिनेत्री नताशा सुरीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.एक महत्वाचे काम आटपून ती पुण्यावरुन मुंबईला आली.आणि इकडे आल्यावर तीला ताप आणि थकवा जाणवला.ज्या नंतर तिने कोरोना चाचणी केली असता ती सकारत्मक आली.ती सध्या घरातच उपचार घेत असून प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या पदार्थाचे ती सेवन करत आसल्याची माहिती स्वत: नताशाने दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version