मुंबई, १ सप्टेंबर २०२२ एकिकडे शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेना कोणाची या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत सतत २५ वर्ष सत्तेत बसणाऱ्या शिवसेनेला खाली खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तसेच आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात समावेश न करता मुंबई ची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
५ सप्टेंबर ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. अमित शाह लालबागचा राजा आणि सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान वर्षावरही जाणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे मुंबई चे नवे अध्यक्ष आशिष शेलार यांची ही भेट घेणार आहेत.आणि त्यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेणार आहेत.
अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेवरील विजयासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये BMC भाजपच्या हाती येण्यासाठी त्यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्य बैठक घेतली जाणार आहे. गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून विशेष रणनीती आखली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे