चांद्रयान ३’वर बनणार चित्रपट, ‘मिशन मंगल’ हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक जगन शक्ती यांची घोषणा

मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ : संपूर्ण देश ‘चांद्रयान ३’ च्या यशस्वी लँडिंगचा आनंद साजरा करत आहे, मग बॉलीवूड यापासून लांब कसे राहणार? अक्षय कुमारसोबत २०१९ मध्ये ‘मिशन मंगल’ हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी ‘मिशन चांद्रयान-३’वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. केवळ अक्षय कुमारच नाही तर मिशन मंगलची संपूर्ण टीम या चित्रपटात परत दिसणार आहे.

जगन शक्ती याला सध्या त्याच्या वैज्ञानिक बहिणीच्या सहकार्याने स्क्रिप्टवर काम सुरू करायचे आहे. ते लवकरच या चित्रपटाचे शीर्षक नोंदणीकृत करणार आहेत. मात्र त्याला या प्रकल्पाचे नाव फक्त ‘चांद्रयान- ३’ ठेवायचे आहे. या चित्रपटात कोण कोणती भूमिका साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसली तरी अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.

बातमीनुसार, हा खूप महागडा प्रोजेक्ट असू शकतो. जगन शक्ती यांनी केवळ ३२ कोटींमध्ये ‘मिशन मंगल’ बनवला. तर ‘चांद्रयान’साठी VFX वगैरे खूप महागडे ठरू शकतात. मात्र, २०१४ मध्ये अशाच विषयावर हॉलिवूड चित्रपट इंटरस्टेलर आला होता, ज्याचे बजेट १४०० कोटी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा