पुणे, २१ नोव्हेंबर २०२२: एमपीएससीच्या कार्यपद्धतीवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण होत राहिलंय. मग ते प्रश्नपत्रिका बाबत असो किंवा निवड प्रक्रिया असो. एमपीएससी कडून होत असणाऱ्या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार पुन्हा समोर येताना दिसतोय.
वैज्ञानिक अधिकारी ,संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण सामान्य राज्य सेवा या पदांच्या भरतीसाठी एमपीएससी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रिया दरम्यान घोळ झाला असल्याचं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. याविषयी चौकशी व्हावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलीय.
नक्की काय आहे प्रकरण ?
जाहिरात क्रमांक १८/२०१८ मध्ये गट अ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील नादर्गी दिगंबर यल्लाप्पा, ढवळे दत्तात्रय सदाशिव, कायतें जयपालशिंग नथूसिंग हे तिन्ही उमेदवार पात्र म्हणून त्यांना ग्रुप अ च्या मुलाखतीत बोलाविण्यात आले, गुणवत्ता यादीत त्यांना गुण देखील देण्यात आले. परंतु हे तिन्ही उमेदवार जाहिरात क्र.४७/२०१८ नुसार गट ब पदासाठी अनुभव ग्राह्य नव्हते. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, हे विद्यार्थी गट अ साठी पात्र आणि गट ब साठी अपात्र कसे?


विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?
१) ज्या वेळी ०३७/२०२२ गट ब पदांसाठी अर्ज मागविण्यात आले त्या वेळी सगळ्यांसाठी लागणारा अनुभव हा ३ वर्षांचा होता परंतु ज्या वेळी पात्र उमेदवारांची यादी निघाली त्यावेळी अनुभव प्रत्येक जाती नुसार वेगळा केला गेला. हे जाहिरातीमध्ये नमूद नव्हतं त्यामूळं या निर्णयाशी आम्ही सहमत नाही.
२) आमच्या निदर्शना नुसार खोटा अनुभव लावून काही लोकांची निवड झालेली आहे. त्यामूळं आमचा अनुभव खरा असून सुद्धा आम्हास अपात्र ठरवलं, याची MPSC बोर्डानं दखल घ्यावी. तसेच रीतसर चाळणी परीक्षा घ्यावी ही कळकळीची विनंती
३) ०३७/२०२२ गट ब पदांसाठी २१ व २२ नोव्हेंबर ला होणारी मुलाखत त्वरित थांबवून चाळणी परीक्षेद्वारे व्हावी ही विनंती
४) शिक्षण – तुम्ही B.E आणि Msc ची तुलना करू शकत नाही. कारण B.E चं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ४ वर्ष लागतात आणि MSc चं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ५ वर्ष लागतात. मग MSc च्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत B.E च्या विद्यार्थ्यांचा १ वर्ष अनुभव जास्तच असतो. याविषयी आयोगानं चौकशी करावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी