आमदार अशोक पवार यांनी स्वतः नागरिकांचे चेकअप करून, माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा केला शुभारंभ

शिरूर, दि. २१ सप्टेंबर २०२०: शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार आणि माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वडगाव रासाई आणि मांडवगण फराटा येथे कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करणारी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या प्रभावी योजनेची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी आमदार अशोक पवार यांनी घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या कोवीड योद्ध्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आमदार अशोक पवार आणि सुजाता पवार यांनी स्वतः काही लोकांचे बॉडी टेंपरेचर व ऑक्सिजन लेव्हल चेक करून या योजनेची सुरुवात केली.

यावेळी विजय नलावडे बी. डी. ओ शिंदे साहेब वि. अ. पंचायत, घोडगंगा कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, मांडवगणचे सरपंच कदम अण्णा, वडगाव रासाई सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव शेलार, डॉ. सातपुते वैद्यकीय अधिकारी, डॉ. रोहिणी दरेकर वैद्यकीय अधिकारी, इसवे मॅडम, रासकर आर. डी. ग्रामविकास अधिकारी, झिरे बी. ए. आरोग्य सेवक, ठोंबरे सर झोनल ऑफिसर, केंद्रप्रमुख, दिवे सर मुख्याध्यापक हायस्कूल यांची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे