बीड, ४ जानेवारी २०२३ माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी स्वतः पोस्ट करत माहिती दिली आहे.
- नेमके काय म्हटले धनंजय मुंडे यांनी?
मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील भेटी आणि कार्यक्रम आटोपून परळीकडे जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास माझ्या वाहनाचा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं छोटासा अपघात झाला आहे. अपघातामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला आहे. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असून, कोणीही अफवांवर विश्वासा ठेवू नये असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
- मुंडे यांना उपचारासाठी मुंबईला हलवणार
दरम्यान, धनंजय मुंडे यांना आता उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे. ब्रिज कॅन्डी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी धनंजय मुंडे दुपारी दोन वाजता लातूरवरुन रवाना होणार आहे. एअर ॲम्बुलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी नेले जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.