आमदार महेश लांडगे यांनी वाटले १० लाख लाडू- पोलिसांकडून नोटीस.

भोसरी, दि. ५ ऑगस्ट २०२० :आज ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजनही करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्याकडून राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये १० लाख लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने यावर आक्षेप घेत आमदार लांडगे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

भोसरी येथील इंद्रायणीनगर येथील येथे मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी एका मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. लाडू बनवण्यासाठी नेमण्यात आलेल्या कारागिरांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी बजावलेल्या या नोटिसला अद्याप तरी आमदार महेश लांडगे यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. कोणतीही भूमिका त्यांनी याबाबत स्पष्ट केलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा