आमदार रवींद्र चव्हाणांची सरकारवर बोचक टिका

कल्याण, १३ ऑगस्ट,२०२०: भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारची भूमिका गेंड्याच्या कातडीसारखी आहे सरकारला आणि सरकार मधील मंत्र्यांना थोडीशी ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे,’ असं म्हणत बोचक टिका केली आहे . अवाजवी वीजबिल रक्कम , सततची वीज खंडित होणे यामुळे नागरिक त्रस्त आहेत,त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पडू नका, अशा शब्दात आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण मधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला.

लोकांना जितका विजेचा वापर आहे, तितकंच बिल देण्याची छोटीशी मागणी लोक करत आहेत. ती मागणी सुद्धा हे सरकार पूर्ण करू शकत नाही हे दुर्दैव आहे. अशी घणाघाती टीका भाजप सरचिटणीस आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. पुढे बोलताना दिल्ली सारखे मॉडेल करण्याचा प्रयत्न असल्याचे सरकार सांगत आहे मात्र दिल्ली मॉडेल तर दूर राहिले मात्र वीज ग्राहकांना भरमसाठ बिले देत वीज ग्राहकांवर अन्याय केला आहे. याबाबत येणाऱ्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू असे सांगितले. लॉकडाऊन काळात महावितरणाने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांबाबत भाजप तर्फे राज्यभरात कडाडून विरोध सुरू आहे.

त्यामुळे योग्य पद्धतीने नागरिकांच्या मताचा वापर करा आणि नागरिकांच्या मागण्या पूर्ण करा असे, आवाहन भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे अचानकपणे केलेली बिलवाढ आणि सततची वीज खंडित होत असल्याने घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे त्यामुळे हा प्रश्न लवकर सोडवा नाहीतर आम्ही आंदोलन करू असे, आवाहन यावेळेस भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा