आमदार रोहित पवार यांनी सीना आणि कुकडी भुसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेतली बैठक.

कर्जत, १० ऑगस्ट २०२०: कर्जत तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय भुसंपादनाचा यावर कुकडीचा उर्वरीत असलेला भुसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेतली.

कर्जत तालुक्यातील अनेक दशके प्रलंबित असलेल्या कुकडी व सिना भुसंपादनाचा अडकून पडलेला प्रश्न आ.पवारांच्या प्रयत्नातून बहुतांश मार्गी लागला आहे. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुकडी भु-संपादित शेतकऱ्यांना 6 महिन्यांच्या कालावधीतच तब्बल 32 कोटी रुपयांचा मोबदला मिळवून देण्यात आ.पवारांना यश आले आहे. ज्या शेतकरी बांधवांना  मोबदला मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडू आणि मोबदला मिळवुन देऊ असा शब्द आ. रोहित पवारांनी शेतकऱ्यांना दिला होता.

कुकडीचे अधिकारी आणि भु-संपादित शेतकऱ्यांचा समन्वय साधण्यासाठी वेळोवेळी बैठका घडवून आणल्या. भुसंपादन मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मोबदला मिळावा यासाठी रोहित पवारांसह कुकडी व सिनाचे सर्व अधिकारी काम करत आहेत. पुढील काही काळातच हा प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, सिना प्रकल्पाचे कार्यकारी उपअभियंता बाजीराव थोरात, कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदी बैठकीस उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा