कर्जत.२.जून.२०२० : अहमदनगर आणि पुणे जिल्हा यांना विलग करणारी नदी म्हणजे भिमा नदी. याच नदीवर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बुडीत बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाची पाहणी केली.
या वर सविस्तर वृत्त असे की, सिध्दटेक परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून बुडीत बंंधाऱ्याची मागणी केली होती. बंधारा नसल्याने शेतक-यांच्या शेतीचे फार मोठे नुकसान होत होते. याबाबत आमदार रोहित पवार यांनी तातडीने लक्ष्य घालून सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिली होता. आज आमदार रोहित पवार यांनी सिध्दटेक येथे बुडीत बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली व कामाविषयीचा आढावा ही घेतला.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, हा बुडीत बंधारा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या वेळी आमदार रोहित पवार यांच्या सोबत सिध्दटेक ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश पवार, पोलिस पाटील दादासाहेब भोसले, बाळासाहेब मोरे,अमोल भोसले, रामदास बिबे,आणि आमदारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष