कर्जत, दि.२९ मे २०२०: कर्जत मधील उद्योग व्यवसाय प्रकल्प उभारणीसाठी आमदार रोहित पवार यांनी बँकेचे अधिकारी आणि विविध कृषी अधिकारी यांच्या सोबत व्हिडिओद्वारे आढावा देखील घेतला.
स्मार्ट प्रकल्प या ठिकाणी उभारणीसाठी त्यांनी अभियान सुरू केले आहे. यामध्ये कृषी, ग्रामीण ग्रामविकास, पणन,महिला बाल कल्याण या सह विविध विभागाचा सहभाग होणार आहे.
या सर्व प्रकल्पांना जून महिन्यापासुन प्रारंभ करण्याचा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा मनोदय आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या फार्मर कंपन्यांना विशेष प्रोत्साहन देणार आहेत. त्याच प्रमाणे शेळी पालन , महिला बचत गट, कृषी सहकारी बँक यांना मदत करण्याचा मानस आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात युवकांना हाताला काम मिळेल, रोजगार निर्मिती होईल. शेतीच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे.
या बैठकीसाठी स्मार्ट प्रकल्पाचे प्रवक्ते डाॅ.संजय पांढरे,दशरथ दाबळे, प्रविण पाटील, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर हे सर्व मान्यवर व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष