छत्रपती संभाजीनगर २४ फेब्रुवारी २०२४ : आमदार संजय शिरसाठांनी आज विविध विषयांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय शिरसाठ यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे असुन त्यांच कार्य आम्ही एकदम जवळून पाहिलेल आहे. त्यांच्यासोबत १९८८ च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये संभाजीनगर मध्ये आम्ही पक्षाचा प्रचार केलाय. दुर्दैवाने नंतरच्या काळात त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्याला ते जाहीर सभेत कधी बोलले नाही. त्यांच्या जाण्याने अनुभवाची एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. ही आघाडी कधीही होणार नाही, ते वंचितलाही बरोबर घेत नाहीत, राजू शेट्टीना बरोबर घेत नाही आणि आता काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही. हे सगळे संजय राऊत यांच्यामुळे चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे. तुम्ही २६,२७ तारखेपर्यंत वाट पहा आणि मग तुम्हालाच कळेल की युती कशी होते. ठाकरे गटाचअस्तित्व कमी झाल्यामुळे निश्चितच काँग्रेसला जास्त जागा पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. शरद पवार यांना सुद्धा माहिती आहे की आपल्याला आपल्या अस्तित्वाची लढाई जर लढायची असेल तर काही जागा या आपल्या पदरात आल्या पाहिजे. प्रकाश आंबेडकरांना सुद्धा चांगल्या जागा दिल्या तर ती युती करतील. प्रत्येकाच्या महत्त्वकांक्षा आहे, त्यामुळे मी वारंवार सांगत आलेलो आहे की ही आघाडी होणार नाही.
आमची युतीची कोणत्याही प्रकारची बोलणी झालेली नाही. आणि ती युती जेव्हा होईल त्या टायमाला ते चित्र स्पष्ट होईल. परंतु फॉर्मुला असाच ठरलेला आहे की ज्यांना ज्या जागा पूर्वी लढलेल्या आहेत त्या जागा आम्हीच लढणार आहोत. आता फक्त आमच्याबरोबर आलेले अजित दादा यांची असलेली डिमांड झालीकी सामोपचाराच्या नंतर निर्णय घेण्यात येईल, म्हणून आमच्याकडे वाद होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची गॅरंटी काय? जो माल मार्केटमध्ये विकतो त्याची गॅरंटी दिली जाते. नेमका आता यांचा ब्रँड नेम कोणता आहे शरद पवार आहे उद्धव ठाकरे आहे की राहुल गांधी आहे हे यांनी स्पष्ट करावं, असं सांगताना शिरसाठांनी राजाची सवारी आता येत आहे, त्यामुळे तुतारी धारकांनी समोर उभा राहून राजाचे स्वागत कराव, असा टोला जितेंद्र आव्हाडांना लगावला.
न्यूज अनकट प्रतिनीधी : संजय आहेर