कावड यात्रेत आमदार संतोष बांगरांनी नाचवल्या तलवारी, गुन्हा दाखल

15

हिंगोली, २९ ऑगस्ट २०२३ : कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आणि परवानगी नसतानाही डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कळमनुरी पोलिसांत हे गुन्हे दाखल झाले आहेत. हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आमदार बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. कळमनुरी येथील चिंचोळेश्वर महादेव मंदिरापासून हर हर महादेवच्या गजरात बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कावड यात्रेत हजारों भाविक सहभागी झाले होते.

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी कावड यात्रा काढली जाते, मागील पाच ते सहा वर्षांपासून कावड यात्रा काढली जाते. कळमनुरी येथील चिंचोळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत यात्रा काढली जाते. त्यानुसार या कावड यात्रेचे आयोजन केले होते. मागील तीन महिन्यांपासून त्याचे नियोजन करण्यात येत होते.

ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर लगेचच कावड यात्रा असल्याने बांगर मोठे शक्तिप्रदर्शन करतील, अशी शक्यता होतीच. त्यानुसार बांगर यांनी तयारी देखील केली होती. मात्र, या कावड यात्रेतील लोकांना तलवार दाखवल्याप्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या यात्रेत परवानगी नसताना डीजे लावल्याने आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. कळमनुरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा