सातारा मेडिकल कॉलेजमध्ये भंगार घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आमदार शशिकांत शिदे यांची मागणी

खटाव, ३० डिसेंबर २०२२ : सातारा येथील मेडिकल कॉलेज उभारण्यात येणाऱ्या जलसंपदा विभागाच्या जागेवरील शेकडो इमारती निर्लेखित न करता, त्या पाडण्याचे टेंडर न काढता कोट्यवधींचा भंगार घोटाळा झाला आहे. या प्रकरणात आम्ही लागतील ते पुरावे देतो. दोषींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आमदार शशिकांत शिदे यांनी विधिमंडळात केली आहे.

यामध्ये काही चुकीचे घडले असेल तर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन ना. गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आमदार शशिकांत शिदे यांनी जोरदार आरोप केला. ते म्हणाले, की भंगाराची चोरी झाल्याचे पुरावे देतो, कोणती वाहने वापरली त्यांचे नंबर देतो.

यावेळी कायदेशीर बाबी पूर्ण करून आणि निविदा काढून इमारती पाडण्याचे काम केल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. तरीही या प्रकरणात घोटाळा झाल्याचे आमदार शशिकांत शिदे सांगत असतील तर एक महिन्यात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन ना. गिरीश महाजन यांनी दिले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा