आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट

पुणे, १२ नोव्हेंबर २०२०: आज शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मा. आदित्यजी ठाकरे (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याशी भेट घेऊन पर्यटन खात्याने नुकतेच प्रस्तावित केलेल्या ‘साहसी उपक्रम धोरणाच्या मसुद्या मध्ये असणाऱ्या त्रुटी व महाराष्ट्रातील तमाम साहसप्रेमी, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, गिर्यारोहक इत्यादी यांचे संबंधित प्रस्तावित G.R. बद्दल असणारे आक्षेप व प्रमुख मागण्या यांचे विस्तृत निवेदन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने देण्यात आले.

मा. आदित्यजी यांनी निवेदन समजावून घेऊन येत्या महिनाभरामध्ये साहसी उपक्रम व साहसी क्रीडा प्रकार यांच्याशी निगडित महाराष्ट्रातील प्रमुख संस्थांशी सविस्तर चर्चा करून कोणत्याही जाचक अटी नसलेला, सर्वसमावेशक व प्रगतशील ‘साहस उपक्रम धोरण’ G.R. पारित करण्यात येईल, तसेच साहसी क्रीडाप्रकार यांचे ‘खेळ’ म्हणून असणारे अस्तित्व अबाधित ठेऊन ते अधिक दृढ करण्याचेच प्रयत्न केले जातील, असे सांगितलेे.

बैठकीमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे ,उमेश झिरपे (जेष्ठ गिर्यारोहक व अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ), भूषण हर्षे (एव्हरेस्टवीर, समिती सदस्य, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ), चंदन चव्हाण (समिती सदस्य, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ) हे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा