गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी

कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत आमदार सुनिल शेळके यांनी केली पाहणी

पुणे , ७ नोव्हेंबर २०२० :कान्हे येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाबाबत मध्य रेल्वे विभागाचे मुख्य पूल निर्माता अभियंता बी.नंदराम, उप अभियंता रिजवान अहमद व मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.

कान्हे-टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्राच्या मार्गावरील अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा रेल्वे उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. आंदर मावळच्या दळणवळणाचा हा एक प्रमुख मार्ग आहे. रेल्वे गाड्या ये-जा करत असल्याने कान्हे रेल्वे गेट वारंवार बंद होते. यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. कान्हे रेल्वे उड्डाणपूल नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक तसेच इतर वाहतुकीमुळे स्थानिकांसह इतरांची गैरसोय होत आहे. या पुलाचे काम रखडल्याने आंदर मावळच्या सर्वांगीण विकासात अडचणी निर्माण होत आहेत.

आमदार शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्यास सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे अधिकारी आज प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले होते. प्रत्यक्षात या पुलाचे काम करताना पर्यायी मार्गावरुन कशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था करावी लागेल तसेच प्रत्यक्ष कामासाठीचे भूसंपादन व इतर गोष्टींची माहिती घेत पाहणी केली. कान्हे रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी संबंधित विभागाचे हे आश्वासक पाऊल आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बी.एन. बहिर, उपअभियंता वैशाली भुजबळ, सरपंच विजय सातकर, उपसरपंच महेश सातकर, प्रकाश आगळमे, ग्रामपंचायत सदस्य आशाताई सातकर, अश्विनीताई शिंदे, नामदेव शेलार, बाबाजी चोपडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version