आमदार सुनील शेळके यांचा जनसंवाद दौरा: समस्यांचे निराकरण आणि अवैध धंद्यांवर कारवाई

34

पुणे, २६ जानेवारी २०२५: वडगाव मावळ शहरात आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद दौरा केला आहे . या दौऱ्यात त्यांनी थेट कारवाईच्या माध्यमातून अवैध मटका व दारूच्या अड्ड्यांवर आळा घालून नागरिकांचा विश्वास जिंकला. त्यांच्या ठोस भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मकता आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

प्रभागनिहाय समस्या आणि उपाययोजना

आमदार शेळके यांनी विशाल लॉन्स, मोरया कॉलनी, पंचमुखी चौक, केशवनगर, आंबेडकर कॉलनी आणि संस्कृती सोसायटी यांसारख्या भागांना भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागांतील नागरिकांनी पाणीपुरवठा, खराब रस्ते, गटार व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या अडचणी मांडल्या. या समस्या ऐकून, आमदार शेळकेंनी नगरपंचायत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
तसेच, प्रभागांतील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी विकास प्रकल्प हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये विकासकामांबाबत विश्वास निर्माण झाला असून सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अवैध धंद्यांवर कठोर कारवाई

दौऱ्या दरम्यान केशवनगर परिसरातील नागरिकांनी रेल्वे लाइनजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्याची तक्रार केली. तक्रारीची तातडीने दखल घेत, आमदार शेळकेंनी घटनास्थळी धडक दिली. या कारवाईत मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक ४ मध्ये चालणाऱ्या अवैध दारू अड्ड्याविरोधात छापा टाकण्यात आला. या कारवाईतही मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कृतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला असून, अवैध धंद्यांवर कायमचा आळा बसण्याची अपेक्षा आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासह विश्वासार्ह नेतृत्व

आमदार सुनील शेळके यांच्या या जनसंवाद दौऱ्याने केवळ समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही तर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा आदर्शही निर्माण केला. त्यांच्या ठोस कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगाव मावळ शहरात समस्यांचे निराकरण आणि अवैध धंद्यांवर कठोर पावले उचलल्यामुळे शेळकेंच्या नेतृत्वाची सकारात्मक छाप उमटली आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय असून, विकासाच्या दिशेने पुढील पाऊल उचलले गेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा