आमदार यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्त्वपूर्ण जबाबदारी

शेळगाव(पुणे), १७ जुलै २०२३: शेळगाव(इंदापूर)चे सुपुत्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू व मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने यांची, विधानसभेचे तालिका अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मुंबई येथे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना पवार यांनी महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे.

आमदार यशवंत माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू म्हणून राज्यात ओळख आहे. यापूर्वी माने यांनी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापतीपद भुषविले आहे व सध्या संचालकपद भूषवत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमदार यशवंत माने यांनी घेतला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा