राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांनी बैठक

मुंबई: १९ जुलै २०२२: राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत आता मनसे सक्रीय झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे ऍक्शन मोडवर आले आहेत. अलीकडेच राज यांच्यावर शस्तक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांती घेऊन मनसे महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

आज मनसेच्या पदाधिकार्याची बैठक राज ठाकरे घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे रणनीती आखत आहेत. ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. राज ठाकरे बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरे यांनी विश्रांती घेतली होती.

आता मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांनी पक्षाच्या पधादिकाऱ्यां सोबत बैठकीला सुरुवात केली आहे. वॉर्ड रचनेबाबत आणि इच्छुक उमेदवारांशी राज ठाकरे संवाद साधनार आहेत. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

राज-फडणवीस भेटीनंतर बाळा नांदगावकर म्हणाले होते की, सरकारमध्ये समावेश असण्याचा आमचा संबंध नाही. पण दोघांमध्ये चर्चा झाली असेल तर माहीत नाही. कुठल्याही मोबदल्यासाठी राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आता मनसेला सकारात्मक वातावरण आहे.

लोकांमध्ये सगळ्याच पक्षांबद्दल अविश्वस निर्माण होत आहे. आमचा एकला चलो रे नारा आज, उध्याही राहणार आहे. पण भविष्यात नक्की काय होईल हे सांगता येत नाही, असंही नांदगावकरांनी सांगितले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा