मनसे शहराध्यक्ष सागर बंदपट्टे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..

माढा, ११ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सागर बंदपट्टे यांचा ३४ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून उम्मीद येथील अनाथ बालकांना खाऊ वाटप करून व शालेय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला.

या लहान मुलांच्या व्यथा जाणून उपाय योजना व मदत करण्यात आली. यावेळी शाडो राज्‍यमंत्री दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, माढा तालुकाध्यक्ष सुभाष खटके, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग ढेरे, माजी सरपंच प्रकाश वाघमारे, वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार धोत्रे, उपाध्यक्ष गणेश देवकर, संघटक कृष्णा पवार, प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष सागर पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे, रिपाई युवक शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड, बसपा शहराध्यक्ष सचिन वाळके, करमाळा मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा