कोरोना काळातदेखील कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना मनसे’कडून सन्मानचिन्ह

पुणे, १८ ऑक्टोबर २०२०: पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. हे प्रकरण बरेच चर्चेत राहिलं होतं. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी कार्डिअॅक अँब्युलन्सची गरज होती. मात्र, ती वेळेवर न मिळाल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी आपलं पत्रकारितेचं कर्तव्य जीवाची पर्वा न करता पार पाडलं होतं आणि त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वडगाव शेरी मतदारसंघातर्फे कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन आज पत्रकारांना गौरवण्यात आलं.

 

यामध्ये न्यूज अनकट चे पत्रकार निखिल जाधव व कॅमेरामॅन दशरथ डोरके यांनादेखील गौरवण्यात आलं. कोरोनाच्या काळात आपलं कर्तव्य बजावत लोकांपर्यंत सर्व घडामोडी व आवश्यक सूचना पोहोचवण्याचं काम करणाऱ्या इतर पत्रकारांनाही या वेळी गौरवण्यात आलं.

यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, विभाग सचिव रमेश जाधव, आयोजक व विभाग अध्यक्ष सुनील कदम तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा