मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: भारतात लोकशाही जरी असली तरी तिला टिकवून ठेवण्यासाठी विविध गटातील नेेते हे राजकारण करतात. मुळात बदलत्या काळानुसार राजकारण देखील हे फार आधुनिक आणि खर्चिक होत आहे. ज्यामुळे अनेक निष्ठावंत होतकरु नेत्यांना पुढे येण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. पण, तरी तसे झाले नाही तर मग नैराश्यातून वाईट मार्ग अवलंबला जातो. अशीच घटना नांदेड शहरातून समोर आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व कुटुंबीयांची माफी मागणारी सुसाईड नोट लिहीत नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. किनवटमधे राहण्या-या सुनीलने आपल्या राहत्या घरी फाशी घेतली. “राज साहेब मला माफ करा आमच्या इथे जात आणि पैशावर राजकराण चालतं जे दोन्ही माझ्याकडे नाही” जय महाराष्ट्र जय मनसे” अशी सुसाइड नोट लिहून त्यांनी आपला प्रवास संपवला.
राजकारणाला भारतात आधीपासून जरा वाईट नजरेनेच बघायची नागरिकांची दृष्टी झाली आहे. त्यात आलीकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकरण हे अत्यंत वाईट पध्दतीने चालू आहे. अशा राजकारणाचा अनेक वेळा कोण तरी होतकरु नेता बळी ठरतोच. तसेच सुनील इरावर यांच्या बाबतीत घडले आणि ते या राजकारणाचा बळी ठरले.
न्यूज अनकट प्रतिनिधी